Sunday , September 20 2026
Breaking News

14 डिसेंबरला अमित शहा दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

Spread the love

 

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उपस्थित खासदारांनी सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अत्याचाराची माहिती गृहमंत्र्यांना दिली. त्याचबरोबर सीमा प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री तणावाची परिस्थिती निर्माण करत असल्याची तक्रार ही त्यांनी केली.
यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सीमाप्रश्नी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *