Saturday , November 7 2026
Breaking News

एंजल फाउंडेशनच्या वतीने जलशुद्धी उपकरणाचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शुद्ध पाणी पिता यावे याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी शहरातील सरकारी उच्च प्राथमिक शाळा नंबर 5 ला फाउंडेशनच्या वतीने जलशुद्धी उपकरणाचे वितरण केले आहे.

सरकारी शाळेमध्ये अनेक मुले शिक्षण घेण्याकरिता येत असतात. त्यामुळे त्यांना या ठिकाणी शुद्ध पाणी पिता यावे आणि त्यांचे आरोग्य चांगले रहावे आहे या हेतूने त्यांनी शाळेतील मुख्याध्यापकांकडे जलशुद्धीकरण उपकरण हस्तांतर केले.

यावेळी शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मिलन पवार, प्रज्ञा शिंदे, भारती बडवी, अवधूत तुडयेकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *