Sunday , July 26 2026
Breaking News

रामदूर्गमध्ये 27 मेंढ्यांचा मृत्यू

Spread the love

 

गुढ आजार; मेंढपाळाला आर्थिक फटका
रामदुर्ग : लम्पी स्कीन आजार एकीकडे धुमाकूळ घालत असताना रामदूर्ग तालुक्यातील मनिहाळ गावात २७ मेंढ्यांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना आज (ता. 23) उघडकीस आली. त्यामुळे मेंढपाळाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

चिलामूर येथील मेंढपाळ विठ्ठल लकाप्पा सनदी यांच्याकडे सुमारे शंभरपेक्षा अधिक मेंढ्या असून, पैकी 27 अत्यवस्थ होऊन दगाविल्या आहेत. एकावेळी 27 मेंढ्या दगाविल्यामागे नेमके कारण काय, हे स्पष्ट झाले नाही.
गुढ आजारामुळे मेंढ्या दगाविल्याचे प्राथमिक तपासात आढळून येत आहे.
राज्यात आणि देशातील विविध राज्यात सध्या लम्पी स्कीन आजाराने धुमाकूळ घातले आहे. बाधित व दगाविणाऱ्या मेंढ्यांची संख्या वाढत आहेत. त्यात सनदी यांच्या मालकीच्या मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्यामुळे याबाबतची चौकशी कऱण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. पशू संगोपन विभागाला तपासासाठी मागणी केली आहे. मेंढ्याच्या मृत्यूमुळे आर्थिक फटका बसला असून, उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न ठाकला आहे.
दरम्यान, घटनेनंतर पोलिस आणि स्थानिक लोकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर मेंढपाळने आर्थिक भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *