Sunday , July 26 2026
Breaking News

पिरनवाडी चेकपोस्ट : २.८९ लाखांची रोकड जप्त

Spread the love

 

बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सप्तसूचनेनुसार प्रशासनाने बेकायदेशीर अवैध कारवाईन विरोधात धडक मोहीम चालविली आहे. या मोहिमेअंतर्गत येथील पिरनवाडी चेकपोस्टवर भरारी पथकाने आज बुधवारी 2.89 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चेकपोस्टवरून जाणाऱ्या इंडिका वाहनाला पोलिस आणि एफएसटीने अडवले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता 2.89 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. जप्त करण्यात आलेली रोकड तिजोरीत जमा होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *