Monday , September 21 2026
Breaking News

संजय राऊत 3 मे रोजी बेळगावात

Spread the love

 

बेळगाव : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येत्या ३ मे रोजी बेळगावमध्ये येणार आहेत.

त्यामुळे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ पुन्हा एकदा बेळगावमध्ये धडाडणार असून प्रचार कार्यक्रम आणि निवडणुकीला वेगळीच रंगत चढणार आहे.

खास. संजय राऊत यांनी उपरोक्त माहिती दिली असून बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण ग्रामीण आणि खानापूर मतदार संघातील समितीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार सभा घेणार आहेत. याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीने खानापूर मध्ये बी फॉर्म भरलेले के. पी. पाटील यांनाही माघार घेण्यासंदर्भात आपण कळविले असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय पक्षांच्या प्रचारासाठी अनेक स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली असून महाराष्ट्रातील इतर राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचाही यात समावेश आहे. मात्र सीमावासियांच्या पाठीशी सातत्याने उभारणाऱ्या शिवसेनेने पुढाकार घेत खास. संजय राऊत यांच्या दौऱ्याची निश्चिती केल्याने मराठी भाषिकांसाठी हि सकारात्मक बाब ठरणार आहे.

दरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनीही खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन प्रचार सभा घेण्याची विनंती केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *