Sunday , July 26 2026
Breaking News

कुडची भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा झंझावात

Spread the love

 

बेळगाव : 30 मे रोजी सायंकाळी कुडची भागांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर यांची प्रचार फेरी काढण्यात आली. गावातील महिला तसेच युवक वर्ग समितीनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने यांच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते. शेकडून नागरिकांच्या सहभागामुळे कुडची गाव समितीमय झाले होते. महिलांनी ठिकठिकाणी आरती ओवाळून ऍड. अमर यळ्ळूरकर यांचे स्वागत केले. गावातील बहुसंख्य मराठी लोकांनी ऍड. अमर यळ्ळूरकर यांना एकमुखी पाठिंबा दर्शविला. त्यांचा प्रचार दरम्यान गावातील छत्रपती शिवाजी चौक येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ऍड. अमर यळ्ळूरकर आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छोटी सभा घेण्यात आली. या सभेमध्ये अनेक वर्षानंतर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने खुर्ची गावामध्ये समितीला बळ मिळाल्याचे चित्र दिसत होते. पंचवीस वर्षांचे कसर भरून काढण्याचा निर्धार यावेळी समस्त गावकऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी बाल शिवाजी लाटेमेळा, जय युवक मंडळ, जय शिवाजी युवक मंडळ, सुदर्शन युवक मंडळ, श्री गजानन तरुण युवक मंडळ, यांचे कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी जोतिबा मुतगेकर, किसन कडेमनी, नामदेव जैनोजी, गळघु चौगुले, सुनील निरजकर, लखन चौगुले, गजानन कोलूचे, ज्योतिबा बेडका, राजू चौगुले, नागेश तारळकर, नामदेव मुतगेकर, विठ्ठल मल्लाप्पा कोळसे, वसंतारकर वामन बेडका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिला वर्ग सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *