Monday , September 21 2026
Breaking News

दीर्घ पल्ल्याच्या सायकल शर्यतीत रोहन रमेश देसाई यांचे सुयश

Spread the love

 

बेळगाव : बॉक्साइट रोड हनुमान नगर येथील गेअर हेड सायकल शोरूम स्टुडिओचे संचालक रोहन रमेश देसाई यांनी हुबळी सायकल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 600 किलोमीटर सायकल शर्यत निर्धारित वेळेच्या अगोदर पूर्ण करून सुयश सुयश संपादन केले आहे.
अँडॅक्स इंडिया रँडोनियर्स, फ्रान्स या संस्थेशी संलग्न असलेल्या हुबळी सायकल क्लब या संघटनेने रविवार दिनांक 21 मे रोजी दीर्घपल्याची ही शर्यत आयोजित केली होती. सहाशे किलोमीटर अंतर सायकलीवरून चाळीस तासात पूर्ण करण्याचे लक्ष्य स्पर्धकांच्या समोर ठेवण्यात आले होते. रोहन देसाई यांनी हे सहाशे किलोमीटरचे अंतर निर्धारित वेळेपेक्षा दोन तास अगोदर म्हणजे 38 तासातच पूर्ण केले. या सायकल शर्यतीचा मार्ग हुबळी कोप्पळ परत हुब्बळी मुंडगोड, यल्लापूर, हुब्बळी, बेळगाव असा होता. यामध्ये बेळगावच्या रोहन रमेश देसाई व व सोमेश अजवान यांनी सुयश संपादन केले आहे. रोहन देसाई हे हनुमान नगर येथील रहिवासी व पंडित नेहरू महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य रमेश देसाई यांचे चिरंजीव आहेत. या खडतर सायकल शर्यतीतील यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *