Sunday , July 26 2026
Breaking News

एम. के. हुबळीनजीक ट्रक पुलावरून खाली कोसळला!

Spread the love

 

बेळगाव : पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक पुलावरून सरळ खाली कोसळल्याची घटना एम. के. हुबळीनजीक घडली आहे. अपघात इतका भयानक होता की ट्रकचा अक्षरशः चुराडा झाला आहे. चालक मात्र या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक चिक्कमंगळूरवरून महाराष्ट्रामध्ये लाकूड वाहतूक करत होता.

दरम्यान मलप्रभा नदीनजीक एम. के. हुबळी येथे महामार्गावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक कठडा फोडून सरळ पुलावरून खाली कोसळला. यात ट्रकचा अक्षरशः चुरडा झाला. या अपघातातून ट्रक चालक रामदास गोडे हे मात्र आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत. दरम्यान या घटनेची नोंद कित्तूर पोलीस स्थानकात झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *