Sunday , July 26 2026
Breaking News

इमारतीला रंग काम करताना चौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : इमारतीला रंग लावताना चौथ्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी नेहरुनगर येथील केएलई कॅम्पसमध्ये ही घटना घडली असून यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

निजाम हसनसाब जमादार (वय ४८) रा. सातवा क्रॉस, आझमनगर असे त्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी दुर्लक्षपणाचा ठपका ठेवत सोमशेखर हिरेमठ, रा. श्रीनगर, शशी प्रकाश कग्गणगीमठ, रा.. सदाशिवनगर या दोघा कंत्राटदारांविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

केएलई कॅम्पसमधील संगम हॉस्टेलचे रंगकाम सुरू होते. चौथा मजला रंगविताना दुपारी ३.५०. वाजता चौथ्या मजल्यावरून पडून कामगार जखमी झाला. त्याला तातडीने केएलई इस्पितळात हलविण्यात आले. मात्र, उपचारांचा उपयोग न होता सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून रात्री उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *