Monday , September 21 2026
Breaking News

सामूहिक योगाद्वारे योग दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : सामूहिक योगाद्वारे प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा-बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा आयुष्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी सकाळी सुवर्ण विधानसौध प्रांगणात सामूहिक योगासने करून 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

बेळगाव सुवर्ण विधानसौध प्रांगणात आज सोमवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार इरण्णा कडाडी यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. संजीव पाटील, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुळधोळी आदी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध योगा संघटनांच्या सहकार्याने आयोजित सदर कार्यक्रमांमध्ये नागरिकांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला होता. योग दिनाच्या निमित्ताने यावेळी सामूहिक योगासनं सादर करण्यात आली.

त्याचप्रमाणे योगासनपटुनी योगा प्रात्यक्षिके सादर केली. योगा तज्ञांनी शरीर आणि आरोग्यासाठी योगासनांची माहिती देऊन त्यांचे महत्त्व विशद केले. सुवर्ण विधानसौध प्रांगणात लोकप्रतिनिधींसह सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि शेकडो नागरिक एकाच वेळी करत असलेली सामूहिक योगासनं लक्षवेधी ठरत होती.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *