Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव शहर कार्यक्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्या

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रातील निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे. विशेषता बेळगाव शहरातील पोलीस स्थानकात नवीन पोलीस निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे.

बेळगाव शहरात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मार्केट पोलीस स्थानकात महांतेश दामन्नावर, माळ मारुती पोलीस स्थानकात जे एम कालिमिरची, कॅम्प पोलीस स्थानकात अल्ताफ मुल्ला, शहरातील महिला पोलीस स्थानकात सुलेमान ताशिलदार, ए पी एम सी पोलीस स्थानकात विश्वनाथ कब्बुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या शिवाय मारीहाळ पोलीस निरीक्षकांना बदली हुक्केरी पोलीस निरीक्षक म्हणून झाली आहे तर निपणीचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांची बदली बंगळुरूला झाली आहे.

चिकोडी पोलीस निरीक्षक पदी विश्वनाथ चौगुले तर बेळगाव शहर स्पेशल ब्रांच पोलीस निरीक्षक म्हणून चननकेशव टेंग्रीकर यांची नियुक्तीचा आदेश आला आहे.

नंदगड पोलीस निरीक्षक पदी एस सी पाटील यांची नियुक्ती झाली आहे लवकरच पोलीस निरीक्षकांची बदलीची दुसरी यादी देखील लवकरच येणार आहे.

अल्ताफ मुल्ला यांनी काकती पोलीस स्थानकात विश्वनाथ कब्बुरे यांनी बेळगाव ग्रामीण तर जे एम कालीमिरची यांनी ए पी एम सी आणि माळ मारुती पोलीस तर चननकेशव टिंग्रीकर यांनी माळ मारुती पोलीस स्थानकात या अगोदर सेवा बजावली आहे त्यामुळे वरील पोलीस अधिकाऱ्यांना या अगोदर बेळगावात काम करण्याचा अनुभव आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *