Sunday , July 26 2026
Breaking News

कावळेवाडीत हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा उत्साहात

Spread the love

 

कावळेवाडी (बेळगाव) : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था, कावळेवाडी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.
अध्यक्षस्थानी ह.भ.प. शिवाजी जाधव उपस्थित होते.
सुरूवातीला श्री संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कल्लापा यळ्ळूरकर व राजाराम बुरुड यांच्या हस्ते झाले.
तेजस्विनी कांबळे हिने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रास्ताविक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी करताना गेल्या पाच वर्षांतील राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी सतत वाचन करावे, संतांचे अभंग पाठांतर केल्यास मनःशांती लाभते. अध्यात्मिकवृतीमुळे स्मरण शक्तीला वाव मिळतो. संतांची शिकवण अंगिकारावी, त्यांची शिकवण दिशा देणारी आहे. या स्पर्धेतून मुलांना प्रोत्साहन देणे हाच विधायक उपक्रम संस्थेनं या श्रावण महिन्यात घेऊन, श्रद्धा, भक्ती, नामस्मरणात वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अहंकार नाहीसा होऊन प्रेमभाव निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी पी. आर. गावडे, राजाराम बुरुड, शिवाजी जाधव, यशवंत मोरे, तेजस्विनी कांबळे यांनी मौलिक विचार मांडले.
व्यासपीठावर शिवाजी जाधव, एम. पी. मोरे, रघुनाथ बाचीकर, मारुती कणबरकर, सुनील बामणे, काशिनाथ मोरे, संजय ओऊळकर, सौ.राणी मा. मोरे, पांडुरंग मोरे, मल्लापा मोरे, सुमित मोरे, उपस्थित होते.
स्पर्धा निकाल….
प्रथम क्रमांक -सुहानी श. पाटील, द्वितीय क्रमांक समृद्धी तु. मोरे, तिसरा -प्रितिका मा. मोरे, चौथा -प्रतिक प. कणबरकर, पाचवा -सानिका सु. बाचीकर,नसहावा.. स्वप्नाली क.बडसकर, सातवा–स्वस्तिक मोरे.
विजेत्यांना पारितोषिके प्रदान करुन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ह.भ.प. शिवाजी जाधव यांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन केला.
गावात पंचवीस वर्षे ज्ञानेश्वर पारायण सोहळा साजरा केला जातो.
या अनुषंगाने अभंग पाठांतर करून नवीन चैतन्य निर्माण होईल. युवापिढीमध्ये अशा उपक्रमांने संतांच्या शिकवणीचा आदर्श घेतील
गावांतून प्रतिसाद उत्तम मिळाला. पंचवीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
सूत्रसंचालन मनोहर मोरे यांनी मानले. आभार तेजस्विनी कांबळे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *