Monday , September 21 2026
Breaking News

गणरायाच्या निरोपासाठी बेळगावनगरी सज्ज; कडेकोट बंदोबस्त

Spread the love

 

बेळगाव : लाखो भाविकांना उत्साह देणाऱ्या यंदाच्या सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीची शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळासह जिल्हा प्रशासनाने मिरवणुकीचे नेटके नियोजन केले आहे. गुरुवारी (दि. २७) दुपारी चार वाजता हुतात्मा चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.

पुणे, मुंबई, कोल्हापूरनंतरची मोठी आणि आकर्षक असणारी विसर्जन मिरवणूक म्हणून बेळगावच्या मिरवणुकीकडे पाहिले जाते. याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. त्यामुळे महामंडळासह प्रशासनानेही विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे. शहर परिसरातील विसर्जन तलाव सज्ज ठेवण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर धर्मवीर संभाजी चौकात प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. पोलिसांनीही कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

दुपारी चार वाजता लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला हुतात्मा चौकातून प्रारंभ होईल. त्यानंतर रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, शनी मंदिर चौक यानंतर कपिलेश्वर पुलावरून कपिलेश्वर तलावाकडे विसर्जन मिरवणूक संपेल. यंदा बहुतांश मंडळाच्या मूर्ती या १५ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून अधिक काळजी घेतली जात आहे. मिरवणूक लवकर सुरू करून सुरळीत व शांततेत पार पाडावी, असे आवाहन गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *