Monday , September 21 2026
Breaking News

गर्भवती महिलेला रिक्षाची धडक; महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : भरधाव ऑटोरिक्षाची गर्भवती महिलेला धडक बसून तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवार दि. २४ नोव्हेंबर रोजी रात्री महात्मा फुले रोडवर हा अपघात घडला असून वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. अपघातात अर्भकाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लक्ष्मीनगर वडगाव येथील वैशाली (वय २३) ही गर्भवती महिला आपला भाऊ व बहिणीसमवेत गुरुवारी रात्री कामानिमित्त महात्मा फुले रोड परिसरात आली होती. त्यावेळी दानम्मादेवी मंदिराजवळ वैशाली, तिची बहीण व इतर कुटुंबीय उभे होते. भाऊ जवळच असलेल्या डेअरीमध्ये दूध आणायला गेला होता.

याचवेळी भरधाव रिक्षाची रस्त्याशेजारी थांबलेल्या वैशालीला धडक बसली. तिला तातडीने खासगी करण्यात चाचणीनंतर इस्पितळात दाखल आले. वैद्यकीय पोटातील सहा महिन्यांच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून अर्भक बाहेर काढण्यात आले. या अपघातात वर्षा (वय १२) या बालिकेसह तिघेजण जखमी झाले आहेत. रिक्षाचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *