Monday , September 21 2026
Breaking News

सीमावासीयांना महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी!

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार असे सूचित करण्यात येते की, सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थी हे महाराष्ट्राचेच विद्यार्थी मानून त्यांनी दिलेल्या शासकीय सेवेतील पदांसाठीच्या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊन गुणानुक्रमे त्यांची शासकीय सेवेतील संबंधित पदासाठी पात्रता पूर्ण होत असल्यास त्यांची नियुक्ती करावी. तसेच ते रहिवाशी दाखल्याचा सक्षम प्राधिकरणाकडून पुरावा देण्यास बंधनकारक नसतील. त्याऐवजी ते महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या 865 गावातील विद्यार्थी असणे आणि त्या मराठी विद्यार्थ्याचे किमान वास्तव्य 15 वर्षाचे असणे अनिवार्य राहील. तरी या अटीत बसून इतर सर्व निकष पूर्ण करून विद्यार्थी पात्र होत असल्यास त्या संबंधित विद्यार्थ्याला नियुक्ती द्यावी. अशा आशयाचे परिपत्रक काढून सामान्य प्रशासन विभागाला सुपूर्द करण्यात आले आहे. तरी स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक असणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सेवेतील पदांसाठी उमेदवारी जाहीर करून जास्तीत मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे अभियंता विभाग अध्यक्ष अमित देसाई यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:
महांतेश कोळुचे : 9113223313

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *