Sunday , July 26 2026
Breaking News

महापौरपदी सविता कांबळे यांची बिनविरोध निवड

Spread the love

 

उपमहापौर पदी आनंद चव्हाण

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदासाठी निवडणूक पार पडली आहे. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. महापौरपद अनुसुचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे तर उपमहापौरपद सर्वसामान्य वर्गासाठी आहे. भाजपकडून महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेविका सविता कांबळे आणि प्रभाग क्रमांक 35 मधील नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी अर्ज दाखल केला होता. अखेरीस नगरसेविका लक्ष्मी राठोड यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे नगरसेविका सविता कांबळे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

आनंद चव्हाण उपमहापौरपदी
उपमहापौर सर्वसामान्य वर्गांसाठी असल्याने भाजपमधील अनेक सदस्य इच्छुक होते. उपमहापौरपदासाठी भाजपाकडून प्रभाग क्रमांक 45 मधील नगरसेवक आनंद चव्हाण आणि प्रभाग क्रमांक 54 मधील नगरसेविका माधवी राघोचे यांनी अर्ज दाखल केला होता. अखेरीस माधवी राघोचे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर उपमहापौरपदासाठी भाजपाचे आनंद चव्हाण आणि प्रभाग क्रमांक 45 मधील नगरसेविका ज्योती कडोलकर यांच्यात निवडणूक झाली. आनंद चव्हाण यांना सर्वाधिक 39 मते मिळाल्यामुळे त्यांची उपमहापौरपदी निवड झाली.

महानगरपालिकेवर भाजपचे 35 नगरसेवक आहेत. काँग्रेसचे 10 नगरसेवक असून म. ए. समिती 3, अपक्ष 9, एआयएमआयएम 1 अशा प्रकारे एकूण 58 नगरसेवक आहेत.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *