Friday , April 10 2026
Breaking News

अपघातात जुने बेळगावचा युवक ठार

Spread the love

बेळगाव : दुचाकी दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बी. एस. येडीयुरप्पा रोडवर घडली आहे. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान जुने बेळगाव नाक्याजवळ ओल्ड पी. बी. रोडवर हा अपघात झाला आहे.

ओमकार लक्ष्मण गडकरी (वय 19) रा. लक्ष्मी गल्ली जुने बेळगाव असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तर ओम राजू नावगेकर हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातातील मयत युवकाच्या मागे आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे. शनिवारी दुपारी जुने बेळगाव येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. घटनास्थळावरून मिळालेल्या मयत युवक शुक्रवारी रात्री येडीयुरप्पा ओल्ड पी. बी. रोडवरून जुने बेळगावकडे मित्रासोबत दुचाकीवरून घरी येत होता. त्यावेळी दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला आदळून अपघात झाला. अपघाताची बेळगाव दक्षिण रहदारी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बिजगर्णी हायस्कूलसाठी रोटरी क्लब ऑफ दक्षिण बेळगावकडून २५ बेंच भेट

Spread the love  बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ, संचलित बिजगर्णी हायस्कूलला रोटरी क्लब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *