Friday , September 20 2024
Breaking News

शिव-भीम शक्तीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Spread the love

 

बेळगाव : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्सव महाराष्ट्र एकीकरण समिती व दलित संघटनेच्यावतीने बेळगाव रेल्वे स्थानकात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, लोकसभा निवडणुकीचे उमेदवार महादेव पाटील व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्प कलाकृतीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला. याप्रसंगी जय भवानी – जय शिवराय, जय भीमरायच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख मदन बामणे, रणजित चव्हाण पाटील, सागर पाटील, दलित नेते कल्लाप्पा मेत्री यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती व दलित संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार

Spread the love  बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *