खानापूर : बेळगाव येथील जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने गुरूवारी परंपरेप्रमाणे शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी बोलताना डॉ. सरनोबत म्हणाल्या की, यावेळी बोलताना जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, आजच्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे. आपला धर्म, आपली संस्कृती टिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणेही काळाची गरज आहे.
यावेळी गीतांजली चौगुले, दीपाली मालकरी, नीना काकतकर, मंगल पाटील, आशाराणी निंबाळकर, वृषाली मोरे, राजश्री आजगावकर आदी उपस्थित होत्या.