बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा दहावीचा परीक्षेचा निकाल 89.12 टक्के लागला असून 32 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह, 78 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 35 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 27 विद्यार्थी पास क्लासमध्ये पास झाले आहे, शाळेच्या अव्वल 10 विद्यार्थ्यांचा निकाल पुढीलप्रमाणे
अस्मिता लोहार व जान्हवी जोशी 96.64 टक्के संयुक्तपणे प्रथम क्रमांक, श्रद्धा ढवळे 96.03 टक्के द्वितीय क्रमांक, वैभव लोणी 95.68 टक्के तृतीय क्रमांक, नम्रता करीगौडर 94,05 टक्के चौथा क्रमांक, ओम बोंगाळे 92.03 टक्के पाचवा क्रमांक.
सृष्टी सावंत 92.16 टक्के सहावा क्रमांक, रक्षित अणवेकर 91.36 टक्के सातवा क्रमांक, सोहम गुरव 91.02 टक्के आठवा क्रमांक, गणेश गुंजीकर 90.08 टक्के नववा क्रमांक पटकावीत उल्लेखनीय कामगिरी केले.
या यशाबद्दल जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी तसेच संत मीरा शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व शिक्षक वर्गाने खास अभिनंदन केले आहे.