Monday , September 21 2026
Breaking News

डेंग्यूमुळे गोजगा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : डेंग्यूमुळे गोजगा गावातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डेंग्यूमुळे निधन पावलेल्या युवकाचे नाव गणेश कल्लय्या जंगम (वय 17 रा. गोजगा) असे आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे गणेश याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
वैद्यकीय तपासणीत गणेश याला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न होताच त्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र उपचाराचा फायदा न होता आज त्याचे निधन झाले. गणेश जंगम हा सरदार कॉलेज शाळेत शिकत होता.
त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे. गोजगा गावात ग्रामपंचायतीने परिसरात देखील स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *