Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेची विशेष सभा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दिनांक २६ जून २०२४ रोजी बेळगांवातील सदाशिव नगर येथे कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंतीच्या शुभदिनी शाहु भवन व बेळगाव येथील मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्माण करण्यासाठी अनिल बेनके यांच्याकडून विशेष सभा घेण्यात आली.
यावेळी छत्रपती राजर्षी शाहु महाराज जयंती साजरी करण्यात आली. कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद सदस्यत्व मोहीम चालु करण्याची सुचना देण्यात आली, कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषद इमारतीच्या बांधकामासाठी बेळगांवातील सर्व तालुका पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेण्यात आला. तालुका समितीची स्थापना करण्याचा आदेश यावेळी देण्यात आला. एसएसएलसी विद्यार्थ्याच्या सत्कार समारंभ करण्यासाठी सल्ला घेण्यात आला. उर्वरित निधी बद्दल चर्चा करण्यात आली, कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे बळकटीकरण करण्यासाठी सदस्यत्व अभियान ठरविण्यात आले, निधी संकलनासाठी विशेष कमिटीची नेमणुक करण्यात ठरविले गेले, कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या मुख्य कार्यालयाकडून निधी मिळवण्याबाबत चर्चा केली गेली.
यावेळी कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल बेनके यांच्यासमवेत जिल्ह्यातील विविध तालुका पदाधिकारी एस. एस. मोरे, बसवराज म्यँगोटी, पी. एम. जगताप, दिलीप पवार, वाय. एस. चौगुले, पी. एच. जाधव, सदानंद गडद, बसवराज यसन्नावर, सुनिल नारायण डोंगरे, मारुती बी. जोई, राहुल पवार, रोहन युवराज कदम, प्रविण परशराम कोप्पद, संजीव भोसले, डी. बी. पाटील, पुंडलिक पात्रोट, श्रीकांत शिंदे व इतर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *