Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स सोशल असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवराज पाटील

Spread the love

 

बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी शिवराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी संजय पाटील, सेक्रेटरी सुनील भोसले व खजिनदारपदी उमेश पाटील यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
जायंट्स भवन येथे मोहन कारेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2024 ते 2029 या पाच वर्षासाठी 15 सदस्य कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत मोहन कारेकर, पी. आर. कदम, अनंत लाड, अशोक हलगेकर, मदन बामणे, अविनाश पाटील, शिवकुमार हिरेमठ, विजय बनसूर, विश्वास पवार, सुनिल मुतगेकर व लक्ष्मण शिंदे यांचा समावेश आहे. माजी अध्यक्ष अनंत जागळे व डॉ. विनोद गायकवाड यांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष शिवराज पाटील हे गेल्या 28 वर्षापासून जायंट्समध्ये कार्यरत असून यापूर्वी जायंट्समधील अनेक महत्वाची पदे भुषविली आहेत. पायोनियर अर्बन बँकेचे संचालक, मराठा समाज सुधारणा मंडळाचे कार्याध्यक्ष याबरोबरच शहरातील अनेक सामाजिक संस्थाशी त्यांचा जवळचा संबंध आहे.
उपाध्यक्ष संजय पाटील हे गेल्या 32 वर्षापासून जायंट्समध्ये कार्यरत असून बेळगावातील सुप्रसिद्ध चांदी कारखानदार म्हणून परिचित आहेत. सेक्रेटरी सुनील भोसले व खजिनदार उमेश पाटील गेल्या 21 वर्षापासून जायंट्समध्ये कार्यरत असून दोघेही येथील जयकिसान होलसेल भाजी मार्केट असोसिएशनचे संचालक आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *