Saturday , November 7 2026
Breaking News

ज्येष्ठ पत्रकार मनोहर कालकुंद्रीकर यांचा वाढदिवस उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठ पत्रकार व दैनिक रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर यांचा ७४ वा वाढदिवस येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संभाजी संताजी यांनी मनोहर कालकुंद्रीकर यांच्या कार्याचा आढावा घेतला व उपस्थितांचे स्वागत केले.
विशाल इन्फ्राबिल्डचे संचालक विजय पाटील, ड्रीम इंडिया कंपनीचे एम डी विजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार अनंत लाड व प्रा. राजेंद्र पोवार आदींनी मनोहर कालकुंद्रीकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ड्रीम इंडिया कंपनी, विशाल इन्फ्राबिल्ड तसेच बेळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने कालकुंद्रीकर यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुहास हुद्दार, शेखर पाटील तसेच ड्रीम इंडिया कंपनीचे प्रतिनिधी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *