बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर शाळा आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या शहापूर माध्यमिक विभागीय अथलेटिक्स क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला.
या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून पीईओ जहिदा पटेल, ज्ञानमंदिर शाळेचे सचिव संजीव नेगीनहाळ, जयदिप देसाई, जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, एल. बी. नाईक, नामदेव पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव, स्पर्धा सचिव बापू देसाई, नामदेव पाटील, सीआरपी संतोष खेमजी, गानगेर, एम. के. पाटील, मारुती डी. उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले, खेळाडू पार्थ चतुर, प्रेम होनगेकर, शुभम पाटील यांनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरून पाहुण्यांकडे सुपूर्द केले. खेळाडू आराध्या हिने सहभागी खेळाडूंना शपथ देवविली यानंतर पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन पर भाषणे केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील तर फरीदा मिर्झा यांनी आभार मानले
याप्रसंगी शहापूर विभागातील सर्व माध्यमिक शालेय क्रीडा शिक्षक व सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.