Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावात मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न : व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

Spread the love

 

बेळगाव : बेळगावात एका मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना रामदेव हॉटेलच्या मागे घडल्याचे उघडकीस आले आहे. नेहरू नगर येथील रहिवासी इस्माईल मुजावर या ७ वर्षीय मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगावमधील नेहरू नगर परिसरातील हॉटेल रामदेवच्या मागील बाजूस हा प्रकार घडला असून याची सर्व दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. मुलाच्या जागरूकपणामुळे मुलाने आपली सुटका करून तेथून पळ काढला आणि घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी थेट पोलीस स्थानक गाठत घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना सांगितले असता त्या परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. यादरम्यान झालेला प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *