बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची विद्यार्थिनी समीक्षा बाळकृष्ण भोसले हिची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
कॅम्प येथील सेंट अँथनी शाळेच्या सभागृहात सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत समीक्षा भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे, आता तिची आगामी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला शाळेच्या क्रीडा शिक्षिका अनुराधा पुरी, मयुरी पिंगट, चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, व पालक वर्गांचे प्रोत्साहन लाभत आहे.