निपाणी (वार्ता) : पर्यावरण संरक्षण करण्याच्या समाजिक भावनेतून येथील शहराबाहेरील दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि जायंट क्लबच्या माध्यमातून फाउंडेशनचे संस्थापक आणि टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोगीत उर्फ निकु पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.१२) स्वमालिकेच्या खणीमध्ये गणेश विसर्जन करण्यासह निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला. सलग ८ वर्षे फाउंडेशनने हा उपक्रम राबविला आहे.
दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून निकु पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निर्माल्य संकलन करून पर्यावरण व पाणी प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेतली. शहर व उपनातील सर्वच भाविकांना गणेश विसर्जनासाठी मंडळातर्फे सर्व प्रकारचे सोय केली होती. तर गौरीच्या निर्माल्य संकलना साठी स्वतःचे ट्रॅक्टर उपलब्ध केले होते. रात्री उशिरापर्यंत घरगुती गणेश मूर्ती विसर्जन व गौरी निर्माल्यासाठी स्वतंत्र काहील व प्रकाशाची व्यवस्था केली होती.
निर्माल्य संकलनासाठी अध्यक्ष सुरेश घाटगे, उपाध्यक्ष महादेव बन्ने, सेक्रेटरी नारायण यादव, वसंत धारव, रमेश भोईटे, रणजीत मगदूम, पुंडलिक कुंभार, सागर पाटील, बबन निर्मले, छोटू पावले, स्वप्निल पावले, राजू पाटील, सागर लोंढे सुरेश शेळके, नितीन उपाळे, हिमांशु पाटील, अभिजीत देवडकर, महादेव मल्लाडे, विक्रांत पोवार, सुनील मल्लाडे व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.
—————————————————————–
‘आठ वर्षापासून पर्यावरण व पाणी प्रदूषण टाळण्यासाठी फाउंडेशनतर्फे कार्य सुरू आहे. आता स्वतःहून भाविक निर्माल्य देत आहेत. त्यामुळे फाउंडेशनच्या उपक्रमाला यश मिळत आहे. पुढील वर्षापासून मूर्तीदानासाठी प्रयत्न करणार आहोत.’
– निकु पाटील, संस्थापक, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन