Monday , April 22 2024
Breaking News

‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ पुस्तक युवकांपर्यंत पोचविण्यासाठी खानापूर युवा समिती कटिबद्ध

Spread the love

बेळगाव (वार्ता) : सीमा लढ्याचा इतिहास सांगणारे ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे पुस्तक बेळगाव खानापूरसह सीमाभागातील प्रत्येक मराठी भाषिक युवकांपर्यंत पोचविण्यासाठी खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिली.
शहरातील जीएसएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि सीमा लढ्याचे जाणकार प्रा. आनंद मेणसे यांनी महाराष्ट्र -कर्नाटक (बेळगाव) सीमाप्रश्नावर लिहिलेल्या ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.
यासंदर्भात खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. आनंद मेणसे यांची भेट घेतली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सीमाप्रश्नावर पुस्तक लिहिल्याबद्दल प्रा. मेणसे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्याबरोबरच शुभेच्छा दिल्या. युवा समितीच्या पंतप्रधान मोदी यांना 9 ऑगस्ट क्रांती दिनी 11 हजार पत्रं लिहिण्याच्या मोहिमेला शुभेच्छा देत स्वतः पत्र लिहिणार असल्याचे मेणसे यांनी सांगितले
यावेळी बोलताना धनंजय पाटील म्हणाले की, प्रा. आनंद मेणसे सरांनी लिहिलेल्या पुस्तकाची बेळगाव, खानापूर तालुक्यासह समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांच्या तिसऱ्या पिढीसाठी उपयुक्तता असेल. सरांनी पुस्तक लिहिले त्यामागे कॉम्रेड कृष्णा मेणसे सरांचे बाळकडू असणारा हे सीमा लढ्यातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून कॉ. कृष्णा मेणसे सरांना ओळखले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिलेल्या या पुस्तकातून तिसर्‍या पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल असे सांगून ‘संघर्ष महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ हे पुस्तक बेळगाव व खानापूर तालुक्यासह सीमाभागातील जास्तीत जास्त मराठी युवकांपर्यंत पोचविण्यासाठी खानापूर म. ए. युवा समिती सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. याप्रसंगी खानापूर युवा समितीचे सचिव सदानंद पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, विलास देसाई व अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

Spread the love  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *