Monday , September 21 2026
Breaking News

जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या महामेळावा

Spread the love

 

बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स २४ रीकनेक्ट अँड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे.
या महामेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व जेष्ठ कलाकार प्रसाद पंडित, उपस्थित राहणार असून समारंभाचे अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी व एस के ई सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत. या महामेळाव्यात महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचपासूनचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. १००० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
महामेळावा समिती सोहळ्याचे नियोजन केले असल्याने विविध माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आहे. महामेळावा अविस्मरणीय व्हावा यासाठी विविध समित्या स्थापून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. बेळगावबाहेरचेही माजी विद्यार्थी महामेळाव्यात सहभागी होत आहेत.

दि. २८ डिसेंबर रोजी होणारे दिवसभरातील कार्यक्रम पुढील प्रमाणे-
– सकाळी १० ते ११ : नोंदणी
– सकाळी ११ ते १२ : उद्धाटन व सन्मान सोहळा
– दुपारी १२ ते २.३० : पुनर्मिलन व जुन्या आठवणींना उजाळा
– दुपारी २.३० ते ३.३० : स्नेहभोजन व समूह छायाचित्र

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *