Monday , September 21 2026
Breaking News

अभिजात मराठी संस्थेच्यावतीने आयोजित समूहगीत सत्रास विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद

Spread the love

 

“अभिजात” मराठी संस्थेच्यावतीने दोन दिवसीय ‘आनंद मेळावा’ मराठा मंदिरात संपन्न झाला. यामध्ये नानाविध अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खास शालेय विद्यार्थ्यांकरिताही बाल संमेलनाचे विशेष सत्र झाले. संगीत, कथाकथन, नाट्यछटा, पथनाट्य, कविता वाचन आदी कार्यक्रम मुलांसाठी आयोजिले होते.
समूहगीत प्रशिक्षण विशेष सत्रासाठी संगीत शिक्षक विनायक मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून समूहगीते शिकविली. त्यांना विद्यार्थ्यांचा उत्सूर्त प्रतिसाद लाभला. विविध शाळांच्या 500 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग दर्शविला आणि एकसूर-तालात दमदार समूहगीतांचे प्रस्तुतीकरण केले.
अभिजात मराठी संस्थेच्या डॉ. संध्या देशपांडे, संमेलनाच्या प्रमुख अतिथी स्वाती राजे यावेळी उपस्थित होत्या. प्रा. भारती सावंत यांनी ओळख करून दिली. जगदीश कुंटे यांच्या हस्ते श्री विनायक मोरे यांना सन्मानीत करण्यात आले. शहरातील अनेक संघ-संस्थांनी एकत्रित येऊन पहिल्यांदाच असा कार्यक्रम आयोजित केला, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *