Thursday , June 4 2026
Breaking News

जायंट्स मेनतर्फे शनिवारी जागतिक महिला दिन

Spread the love

 

बेळगाव : सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे शनिवार दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे.

याप्रसंगी शहरातील एक सन्माननीय नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. परशराम घाडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कपिलेश्वर रोड येथील स्वतःच्या जाइंट्स भवन मध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात, सामाजिक कार्यात तसेच स्वतःच्या व्यवसाय/नोकरीत कार्यरत असणाऱ्या सौ. वर्षा लक्ष्मण मुचंडीकर, सौ. राजश्री बांबुळकर, कुमारी स्मिता बी पाटील, सौ. प्रेरणा गोपीनाथ महागावकर, सौ. निरा नारायण काकतकर, तनवी समीर वेलंगी या सहा कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे ग्रुपचे अध्यक्ष श्री. यल्लाप्पा पाटील व सेक्रेटरी श्री. मुकुंद महागावकर यांनी कळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण अभियान

Spread the love  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बेहेरे फाउंडेशनच्या वतीने नंदीहळ्ळी जवळील नागेनहट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *