Friday , June 5 2026
Breaking News

महाकुंभमेळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाखाचे अर्थसहाय्य

Spread the love

 

बेळगाव : 14 जानेवारीमध्ये प्रयगराज येथे महाकुंभमेळ्याप्रसंगी चेंगराचेंगरी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चार भाविकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपये सहाय्य निधी देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. महाकुंभमेळ्याप्रसंगी गेल्या 14 जानेवारी रोजी प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून बेळगावच्या येथील 4 भाविकांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला ही अतिशय दुख:द घटना होती.

सदर दुर्घटनेनंतर मृत्यूमुखी पडलेल्या ज्योती, मेघा, महादेवी व अन्य एक अशा चौघांसंदर्भात मी प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर सदर मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपयांचे सहाय्यधन पोहोचवण्याचे काम आम्ही केले आहे. संबंधित प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 25 लाख रुपये जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त संबंधित कुटुंबीयांनी उत्तरीय तपासणी अहवाल आणि मृतांच्या मृत्यू दाखल्यात काही शुद्धलेखनाच्या चुका झाल्यात त्या दुरुस्त करण्याची विनंती केली होती. त्यासंदर्भातही मी प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून येत्या दोन दिवसात त्यांनी उत्तरीय तपासणीचा अहवाल आणि मृत्यूच्या दाखल्यातील चुका दुरुस्त करून त्या बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

पंचकन्यांमध्ये अहल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. शेवडे

Spread the love  बेळगाव : गौतमांच्या वेषात देवराज इंद्र आला आहे हे जाणूनही अहल्या इंद्राच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *