Sunday , July 26 2026
Breaking News

सीमाभागातील रुग्णांसाठी, रुग्ण हक्क परिषद सेवाकार्य करणार…

Spread the love

 

मुंबई : उमेश जी चव्हाण संस्थापक अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्य व सौ. अपर्णाताई साठे मारणे अध्यक्ष पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात रुग्णसेवेचे कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्राचार्य श्री. आनंद आपटेकर वैद्यकीय समन्वयक. महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभाग बेळगाव यांनी भेट घेऊन, लोकांच्या जनकल्याणासाठी आरोग्यविषयक व अनेक मोठमोठ्या आजारांविषयी रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून राजाभाऊ गायकवाड उपाध्यक्ष रुग्ण हक्क परिषद यांच्या सोबत चर्चा केली.

यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, नागरिकांना मदत मिळवून देण्याचं काम आम्ही करत आहोत महाराष्ट्रातील कोणत्याही खेडोपाड्यातील आमच्याकडे जो पेशंट येतो व त्याला मदतीची गरज असते ती आम्ही उमेश जी. चव्हाण यांच्या माध्यमातून तात्काळ मिळवून देतो अशाच पद्धतीने, बेळगाव भागातील 865 ग्रामीण क्षेत्रामध्ये रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने अनेक गावांमध्ये नवीन शाखा ओपनिंग करण्यात येतील व वैद्यकीय सेवा समिती बेळगाव आपल्या रुग्ण हक्क परिषदेबरोबर जनसेवेचेकाम करण्यास तयार आहे असे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, सदस्य मंदार देसाई, सदस्य लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *