Sunday , July 26 2026
Breaking News

गुढीपाडव्यानिमित्त 30 मार्च रोजी भव्य दिव्य शोभयात्रेचे आयोजन!

Spread the love

 

बेळगाव : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज स्व- स्वरूप संप्रदायच्या वतीने रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी वडगांव ते जुने बेळगांव येथे गुढीपाडव्यानिमित्त भव्य दिव्य शोभयात्रेचे आयोजन केले आहे.

“अनंत विभुषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम रत्नागिरी” यांच्या दिव्य प्रेरणेने राज्यभर हिंदू नववर्ष, चैत्र प्रतिपदा व वसंतऋतूचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा, यशाचा व कीर्तीचा तथा प्रभू रामचंद्र रावणाला पराभूत करून अयोध्याला आगमन केल्याचा दिवस असल्यामुळे हा विजयाचा दिवस मानला जातो.

भारतीय संस्कृतीचे जतन व वारसा पुढील पिढीसाठी आदर्श राहावा यासाठी सालाबादप्रमाणे संप्रदायाचे गुरुबंधू व गुरू भगिनी संप्रदायीक वेशभूषेत रविवारी 30 मार्चला सकाळी ठिक 7.00 वाजता जिल्हानिहाय भव्य अशी शोभायात्रा काढून जल्लोषात स्वागत होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. दत्त गल्ली श्री. दत्त मंदिर वडगांव पासून सकाळी ठिक 7.00 वाजता शोभायात्रेला सुरुवात होऊन गावातील वेगवेगळ्या चौकातून भ्रमन करीत कलमेश्वर मंदिर जुने बेळगांव येथे समाप्त होणार आहे. शोभयात्रेत, जगद्गुरूश्री यांची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत तसेच विविध वेशभूषेत देखावे समावेश असणार आहे. शोभायात्रेत प्रेम आनंद व उत्साहासाठी भजनी मंडळ, कलशधारी, गुढीधारी महिला भगिनी, झेंडे, पताका, ढोल, ताशाचा गजर आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. या यात्रेत जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनाचे जनकल्याणकारी सामाजिक उपक्रमाची जनजागृती, केली जाणार असून रॅलीत शुद्ध पिण्याचे पाणी, व अल्पोपहार ची व्यवस्था आयोजकांनी केली आहे.

या गुढीपाडव्याच्या शोभयात्रेत सर्व भाविक भक्तांनी सहभागी होऊन या शुभ दिनाचा यशाचा कीर्तीचा व विजयाचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा सेवा समितीचे मार्गदर्शक, अध्यक्ष मंजुनाथ कडकोळ, निरीक्षक संजय वाघावकर व सर्व जिल्हा पदाधिकारी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *