Tuesday , August 18 2026
Breaking News

आनंदनगर वडगाव येथे पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सुरुवात

Spread the love

 

वडगाव : आनंदनगर वडगाव येथे पेव्हर्स बसविण्याच्या कामाला बुधवार (ता. 23) रोजी सकाळी 11 वाजता या भागाच्या नगरसेविका सारिका पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. आनंद नगर दुसरा क्रॉस पासून ते तिसऱ्या क्रॉस पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर जेसीबीने खोदाई करून, त्यावर खडीकरण करण्यात आले. खडीकरण झालेल्या रस्त्यावर पेव्हर्स बसवण्याचे काम आता सुरू झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना दुसऱ्या क्रॉसवरून तिसऱ्या क्रॉसला जाताना हा रस्ता आता सोयीचा होणार आहे. या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय पाहून या भागाच्या नगरसेविका सारिका पाटील यांनी महानगरपालिकेकडे या रस्त्यावर पेवर्स बसवून द्यावेत यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले व या कामाला सुरुवात झाली त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आनंद नगर दुसऱ्या क्रॉस वरील दोन रस्त्यावर खडीकरण करून पेव्हर्स बसविणे, तसेच पहिल्या क्रॉस वरील एका रस्त्यावर खडीकरण करून पेव्हर्स बसवणे. यासाठी दहा लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर काम कंत्राटदार कुमार दिनीमनी हे करीत आहेत. तीनही रस्त्यावर आता पेव्हर्स बसविल्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेविका सारिका पाटील, कंत्राटदार कुमार दिनीमनी, अभियंते मारुती नाईक, उद्योजक श्रवणकुमार जांगिड, राजाराम निलजकर, प्रा. सी.एम. गोरल, यांच्यासह स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री वरद सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : भक्तांच्या नवसाला पावणारा व सर्व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा असे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *