Sunday , September 20 2026
Breaking News

बालवीर विद्यानिकेतनमध्ये जागतिक योग दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दीपमाला घाडी उपस्थित होत्या. प्रारंभी संचालक दशरथ पाऊसकर व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पूर्वी कंग्राळकर व भरत पाटील या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. प्रमुख अतिथी दीपमाला घाडी यांनी योग दिनाचे महत्त्व व त्यापासून होणारे फायदे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शालेय स्तरापासूनच योगा करत राहिल्यास आपण तंदुरुस्त राहण्याबरोबरच मनाची एकाग्रता व बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. कार्यक्रमाला शाळेच्या माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील भाग्यश्री कदम, सिद्धेश्वर तुर्केवाडकर, रश्मी पाटील, धनश्री सांगावकर, संगीता मोकाशी, हेमा पटवर्धन, त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन तेजस्विनी भडांगे यांनी केले तर सूत्रसंचालन गोविंद यांनी गावडे यांनी केले व आभार संध्या जाधव यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *