Monday , September 21 2026
Breaking News

ठाकरे बंधूंनी मराठी भाषिकांच्या हितासाठी एकत्र यावे; विठुरायाच्या चरणी समिती कार्यकर्त्याचे साकडे..

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येऊन सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा असे साकडे पंढरपूरच्या विठुरायाकडे घातले. महाराष्ट्रात सध्या राज व उद्धव ठाकरे बंधू यांच्या संभाव्य युतीबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सहित सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात देखील ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करावा असेच वाटते. नुकताच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर मराठी एकी रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील केला आहे तर राज ठाकरे यांनी देखील “महाराष्ट्र हित सर्व वैयक्तिक मतभेदांपेक्षा मोठे आहे’ असे म्हटले आहे. यासाठी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासाठी पंढरपूरच्या विठुरायाकडे नारायण मुचंडीकर यांनी साकडे घातले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *