Monday , September 21 2026
Breaking News

मुडलगी तालुक्यातील अडवीसिद्धेश्वर मठाचे स्वामीजीवर अवैध संबंधाचा आरोप

Spread the love

 

बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील शिवापूर गावातील अडवीसिद्धेश्वर मठाचे स्वामीजी यांच्यावर अवैध संबंध असल्याचा आरोप झाल्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांनी स्वामीजींना मठाच्या बाहेर काढले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी, विजापूर जिल्ह्यातील तालीकोटी येथील एक महिला तिच्या मुलीसह अडवीसिद्धेश्वर मठात आली. रात्री १० वाजता स्थानिक तरुणांनी त्या महिलेला स्वामीजींच्या खोलीत विचित्र अवस्थेत पाहिले आणि गावकऱ्यांना माहिती दिली. मठात पोहोचलेल्या ग्रामस्थांना स्वामी आणि सदर महिला खोलीत आढळली. गावप्रमुखांनी स्वामीजींची खरडपट्टी काढली. याबाबतची माहिती मुडलगी पोलीस ठाण्याला देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. त्यानंतर स्वामीजी आणि गावकऱ्यांची बैठक झाली. यावेळी गावकऱ्यांनी संतप्त होऊन स्वामीजींना मठात राहू न देण्याची जोरदार मागणी केली. स्थानिकांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर स्वामीजींना मठातून बाहेर काढण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *