Sunday , July 26 2026
Breaking News

अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Spread the love

 

बेळगाव: बेळगावमधील शहापूर पोलिसांनी शहरातील वडगाव-धामणे रोडवरील सिध्दारुढ कॉलनी परिसरात बेकायदेशीरपणे अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

प्रथमेश महेश कणबरकर आणि अनिकेत ज्ञानेश्वर पोठ यांना ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता त्यांनी अंमली पदार्थ विक्री केल्याची कबुली दिली. तसेच, दोन्ही आरोपींकडून ५०,५५० रुपये किमतीचा १ किलो ११५ ग्रॅम गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली ५०,००० रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.
आरोपींविरुद्ध शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्याच्या कलम १२०(ब), (ii) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *