Monday , September 21 2026
Breaking News

अलतगा – कडोली संपर्क रस्त्या म्हणजे मृत्यूचा सापळा!

Spread the love

 

 

बेळगाव : अलतगा- कडोली संपर्क रस्त्यावर अलतगा हद्दीत भले मोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी प्रतिक्रिया व्यक्त होतं आहे. या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे दुचाकी वाहन तसेच मालवाहू रिक्षा चालकांनी या रस्त्यावरुन‌ या प्रवास करण्याचे बंद केले आहे. विशेष म्हणजे अगसगे, चलवेनहट्टी, हंदिगनूर, म्हाळेनट्टी या परिसरातून विद्यार्थीसह प्रवाशांनी भरलेली परिवहन बस‌ची वाहतूक सुरू आहे त्यामुळे सदर रस्ताचा अंतर पार करण्यासाठी वेळ तर जातोच पण जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता पार झाल्यावर सुटकेचा निःश्वास सोडला जातो. त्यामुळे प्रवासी बस सकाळी आणि संध्याकाळ अशा दोनच फेरा या ठिकाणावरुन जात आहे. प्रशासन मोठा अपघात घडण्याची वाट पाहत आहे का शंका व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *