Monday , September 21 2026
Breaking News

“संस्कार भारती” बेळगाव शाखा आयोजित सुगम संगीत कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध

Spread the love

 

बेळगाव : भारतीय कला व संस्कृती याकरिता समर्पित “संस्कार भारती” बेळगाव शाखा आयोजित गायक विनायक मोरे व अक्षता मोरे यांच्या स्वरांजली सुगम संगीत कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. आयएम्ईआर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध भाव-भक्तिगीते व देशभक्तीगीते गाऊन त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. स्वरा व श्रीशा मोरे यांच्या गीतांनी श्रोत्यांची मने जिंकली. त्यांना तबल्यावर नारायण गणाचारी व ऑक्टोपॅडवर स्नेहल जाधव यांनी अप्रतिम साथसंगत दिली. विनायक मोरे व अक्षता मोरे यांचा हृद सत्कार नीता देशपांडे आणि प्रसाद पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी संस्कार भारती बेळगाव शाखेच्या अध्यक्षा डॉ. नीता देशपांडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दीप प्रज्वलनानंतर भारतमाता व नटराज पूजन करण्यात आले. पूजा नागलीकर यांच्या शिष्यांनी स्वागत नृत्य प्रस्तुत केले. प्रांत संयोजक मारूती हुटगी यांनी संस्कार भारतीची संकल्पना स्पष्ट केली. किशोर काकडे यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. मुख्य अतिथी म्हणून पं. नंदन हेर्लेकर आणि लेखक-दिग्दर्शक प्रसाद पंडित उपस्थित होते. त्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी करून शेवटी आभार मानले. यावेळी अनेक मान्यवर तसेच शाखेचे सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *