Monday , September 21 2026
Breaking News

मुख्याध्यापक एम. एन. पाटील यांचा निवृत्तीनिमित बेळगुंदीत सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगुंदी येथील विश्वभारत सेवा समितीच्या कन्या शाळेचे मुख्यध्यापक एम. एन. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी होते.
विद्यार्थीनींच्या स्वागत गीतानंतर संस्थेचे जेष्ठ संचालक बी. बी. देसाई, बिजगर्णीचे माजी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, शिवाजी बेटगेरीकर, गीता ठेकोळकर, मनोहर बाचीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सीआरपी सुवर्णा रेडेकर यांनी सरस्वती पूजन केले. अध्यापक के. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले व जेष्ठ शिक्षक के. पी. बेळगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
निवृत्त मुख्याध्यापक एम. एन. पाटील यांचा विविध संघ-संस्था व व्यक्तींतर्फे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. बी. बी. देसाई यांनी एम. एन. पाटील यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या मुख्याध्यापकपदाच्या काळात दहावीच्या परीक्षेचा सलग दहा वर्षे १०० टक्के निकाल लागला, यातूनच त्यांचे शैक्षणिक योगदान स्पष्ट होते असे ते म्हणाले. विजय नंदिहळ्ळी, लोंढा हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. डी. पाटील, विज्ञान विकास शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कळ्ळेकर, ओलमणी हनुमान सोसायटीचे अध्यक्ष शाहू राऊत, रामचंद्र पाटील, बेबीताई झंगरूचे, शकुंतला सुतार, नेहा पाटील, आरती पाटील, सृष्टी पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली. मुख्याध्यापक पाटील यांनी आपल्या सत्काराबद्द कृतज्ञता व्यक्त केली.
विद्या फाळके यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एम. वाय. पाटील, हेमा हदगल, निंगुली चव्हाण, प्रल्हाद चिरमुरकर, यल्लापा बेळगावकर, अशोक गावडा, संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपलब्ध होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *