Monday , September 21 2026
Breaking News

मच्छे येथील विवाहितेच्या मृत्यूची चौकशी करावी; पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

Spread the love

 

मृत स्वातीला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून देणार : डॉ. सोनाली सरनोबत

बेळगाव : मच्छे येथील नवविवाहिता स्वाती श्रीधर सनदी पूर्वाश्रमीची स्वाती अनंत केदार हिने बेंगलोर येथे आत्महत्या केली. स्वाती हिच्या माहेरच्या लोकांनी स्वातीचा मृत्यू हा आत्महत्या नसून आत्महत्या केल्याचे भासवून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा आरोप पती श्रीधर यांच्यावर केला आहे. याप्रकरणी दोषींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी व मृत स्वातीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजप नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली स्वाती तिच्या कुटुंबीयांसह मुतगे ग्रामस्थांच्या वतीने बेळगाव शहर पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

याबाबत बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, स्वाती हिला तिच्या सासरचे लोक तिच्या शिक्षण, राहणीमान किंवा दिसण्यावरून नेहमी टोमणे मारत असत. याआधी देखील तिला सासरच्या मंडळींनी मानसिक छळ केला आहे त्यामुळे ती काही दिवस आपल्या माहेरी येऊन राहिली होती. नुकताच दोन्ही कुटुंबीयांच्या मध्यस्थीनंतर स्वाती ही पुन्हा आपल्या पती समवेत बेंगलोर येथे गेली होती. परंतु सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या श्रीधर याने पत्नी स्वातीचा खून करून ती आत्महत्या असल्याचे भासवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. उच्चशिक्षित असलेल्या स्वातीच्या खुन्याला कठोर शिक्षा द्यावी व मृत स्वातीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *