Monday , September 21 2026
Breaking News

शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळल्या प्रकरणी ‘तिघांना’ अटक!

Spread the love

 

सौंदत्ती : देशभरात जातीयवादावरून राजकारण चालू असलेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात जातीवादाचा कहर झाल्याचे पहावयास मिळाले.

सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुस्लिम असल्याने केवळ जाती द्वेष मनात ठेवून त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत गावातील समाजकंटकांनी कीटकनाशक टाकल्याची घटना घडली आहे. सागर पाटील, कृष्णा मादार व नागनगौडा पाटील यांना सौंदत्ती पोलिसांनी अटक केली आहे. सौंदत्ती पोलीस स्थानकात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ.भीमाशंकर गुळेद म्हणाले की, हुलीकट्टी गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत एकूण 41 मुले शिक्षण घेत आहेत. सदर शाळेत सुलेमान गोरीनायक हे मुख्याध्यापक पदी कार्यरत आहेत. केवळ त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडण्याकरिता सागर पाटील नावाच्या एका ग्रामस्थाने कृष्णा मादारकडून कीटकनाशक मिळविले होते आणि ते शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत मिसळले दिनांक 14 जुलै रोजी कीटकनाशक मिश्रित पाणी पिल्यानंतर 11 विद्यार्थी अत्यवस्थ झाले त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत समाजकंटकांच्या या कृत्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *