Sunday , July 26 2026
Breaking News

गणेशपूर – बेळगुंदी मार्गावर बसचे नियंत्रण सुटून अपघात ; १४ प्रवासी जखमी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील गणेशपूर – बेळगुंदी मार्गावर आज शुक्रवारी सकाळी बेळगावहून बेळगुंदीच्या दिशेने जात असलेल्या बसचा उचगाव क्रॉसजवळ स्टेअरिंग तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. बस रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

या घटनेत दोन शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी जाळे असून इतर प्रवाशांना सौम्य दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती. सदर अपघातात बसच्या दर्शनी भागाचे पूर्णपणे नुकसान झाले असून स्थानिक नागरिकांनी मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी जिल्हा रुणालयात हलवले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट पाहणी करून पुढील कारवाई सुरु केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *