Saturday , July 27 2024
Breaking News

शिक्षक के. एन. पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

Spread the love

येळ्ळूर : सुळगे (येळ्ळूर) येथील श्री भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयांमध्ये गेल्या 38 वर्षांपासून सेवा बजावत असलेले विज्ञान विषयाचे शिक्षक के. एन. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप असा संयुक्त कार्यक्रम बुधवार ता. 16 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते यल्लाप्पा कुकडोळकर हे होते. प्रारंभी विद्यालयाच्या विद्यार्थिनीनी ईशस्तवन व स्वागत गीत गायिले. त्यानंतर प्रा. सी. एम. गोरल, सौ. पद्मा पाटील, के. एन. पाटील, नेताजी सोसायटीचे उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे, संचालक संजय मजूकर, सौ. माया पाटील, सौ. साधना लोखंडे व सौ. रेणुका सुतार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सरस्वती फोटोचे पूजन अण्णाप्पा येळूरकर यांनी केले. तर मरगाई देवीचे पूजन परशराम येळूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक व्ही. एल. पाखरे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर गेल्या 38 वर्षांपासून भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयात सेवा बजावत असलेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. के. एन. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर नेताजी सोसायटीच्या वतीने प्रा. सी. एम. गोरल, उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे व माजी चेअरमन संजय मजूकर यांनीही के. एन. पाटील यांचा सत्कार केला. त्याचबरोबर परशराम येळूरकर, यल्लाप्पा कुकडोळकर अण्णाप्पा येळूरकर, एम. एम. मुचंडी यांनीही के. एन. पाटील यांचा सत्कार केला. यावेळी अण्णाप्पा येळूरकर, प्रा. सी./एम. गोरल, संजय मजुकर, एम. एम. मुचंडी यांनीही निवृत्ती निमित के. एन. पाटील याना शुभेच्छा दिल्या. व दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप ही दिला. शिक्षक के. एन. पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना भविष्यातील शाळेच्या विकासासाठी प्रयत्नरत राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी निरोप देणारी भाषणे केली, तर काही विद्यार्थ्यांनी निरोप घेणारी भाषणे केली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली आठवण म्हणून शाळेला ग्रीन बोर्ड भेट दिला. गतवर्षी दहावी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वर्षीचा आदर्श विद्यार्थी कुमार जोतीबा पाटील व आदर्श विद्यार्थिनी श्रेया पाटील व प्रणाली बस्तवाडकर यांना फिरता चषक देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या वतीने साधना पाटील यांनी विद्यार्थ्यांना निरोप दिला. शिक्षक ए. वाय. मजूकर यांनी सूत्रसंचालन केले. तर शिक्षिका सी. डी.
पाटील यांनी शेवटी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका उज्वला हट्टीकर, अनिल कुकडोळकर, राजन्नावर, मंगल मजूकर, सौ. मासेकर यांनी प्रयत्न केले.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *