सभासदांना 25% लाभांश जाहीर
बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित या संस्थेची 8 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक सहकाररत्न एल के कालकुंद्री सर, चेअरमन लक्ष्मण मंडोळकर व व्हा. चेअरमन संदीप कदम यांच्या हस्ते झाले, तसेच दिपप्रज्वलन सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले, प्रास्ताविक चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांनी केले व अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक महेश काकतकर यांनी केले, त्याचबरोबर संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना संस्थापक एल के कालकुंद्री सर यांनी सहकारातील महत्व पटवून दिले, त्या नंतर संचालक संतोष केंचन्नावर, सागर डोणकरी, कविता सांबरेकर, बसवंत नाईक व सभासद टी के मंडोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेने 2024-25 या आर्थिक वर्षात 21 कोटीची उलाढाल केली असून 10,77,927.77 इतका निव्वळ नफा मिळविला आहे,तसेच सभासदांना अल्पावधीतच 25% लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली आहे, संस्थेने दाखविलेला विश्वास, प्रामाणिकपणा व तत्पर सेवा पाहून नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवल्या आहेत, अल्पावधीतच ही संस्था प्रगतीपथावर पोहोचली आहे, संस्थेने योग्य नागरिकांना कर्जाचे वाटप केले आहे. तसेच जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे मण्णूर, आंबेवाडी व गोजगा या तिन्ही गावातील प्राथमिक व माध्यमिक मधील एकूण 18 विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
सभेला व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार नारायण शहापुरकर, सिद्राय बाळेकुंद्री, परशराम कदम, जयवंत मंडोळकर, जोतिबा चौगुले, मल्लाप्पा कोतेकर, कल्लाप्पा अष्टेकर, मारुती बामणे, नारायण कालकुंद्री, शीतल चौगुले, लता कडोलकर तसेच संस्थेचे कर्मचारी पूनम डोंगरे, प्रतीक्षा चौगुले, सुनील सांबरेकर, मेघा बांदेकर पिग्मी कलेक्टर यलाप्पा पाटील, प्रभाकर देसुरकर तसेच अ वर्ग सभासद आदी उपस्थित होते. व्यवस्थापक महेश काकतकर यांनी सूत्रसंचालन केले व नारायण शहापुरकर यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta