Monday , September 21 2026
Breaking News

चलवादी-होलेया समाजाला न्याय्य आरक्षणाची मागणी

Spread the love

 

बेळगाव : निवृत्त न्यायमूर्ती नागमोहनदास यांच्या नेतृत्वाखालील अंतर्गत आरक्षण चौकशी आयोगाच्या अहवालात चलवादी-होलेया-बळगाई समाजाला न्याय्य आरक्षण देण्यात आले नाही, असा आरोप करत कर्नाटक राज्य चलवादी महासभा आणि विविध दलित संघटनांच्या वतीने आज बेळगावात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.
बेळगावात डॉ. बी.आर. आंबेडकर उद्यानापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून १५०० हून अधिक लोक सहभागी झाले होते. समाजातील सदस्यांनी ‘न्यायासाठी संघर्ष’, ‘चलवादी समाजाला न्याय द्या’ अशा घोषणा देत मोठ्या उत्साहात भाग घेतला. संघटकांनी म्हटले की, ‘या अहवालात चलावादी-होलेया-बलगाई समाजाच्या लोकसंख्या आणि मागासलेपणाच्या स्थितीनुसार आरक्षण दिले नाही, ही दुर्दैवी बाब आहे. सरकारने तातडीने ही विषमता दूर करावी,’ अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *