Saturday , November 7 2026
Breaking News

बेळगावमध्ये रिक्षा भाड्यावरून वाद, महिलांनी केली रिक्षाचालकाला मारहाण

Spread the love

 

बेळगाव : बेळगावातील डॉ. आंबेडकर रोडवरील जिल्हा रुग्णालयासमोर रिक्षाच्या भाड्यावरून प्रवासी महिला आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन महिलांनी रिक्षाचालकावर हल्ला केल्याचा प्रकार घडला.

मारहाण झालेल्या रिक्षाचालक मोहम्मद अन्वर मकानदार यांच्या म्हणण्यानुसार, ‘मी कमी भाड्याबद्दल विचारले असता, महिलांनी शिवीगाळ केली. त्यांनी रिक्षाची चावी काढून घेतली आणि इतर मुलांना बोलावून मला मारहाण केली. यात मी जखमी झालो असून, रिक्षाची काचही फुटली आहे. मी महिलांवर हल्ला केलेला नाही,’ असे त्यांनी सांगितले.दुसरीकडे, रिक्षातून प्रवास करण्यासाठी आलेल्या महिला प्रवाशी अल्मास यांनी आरोप केला की, ‘आम्ही गांधीनगरला रुग्णालयात जाण्यासाठी रिक्षा केली, तेव्हा त्याने १५० रुपये भाडे सांगितले. आम्ही नेहमी ७०-८० रुपये देतो, असे सांगितले. इतके भाडे का घेतो असे विचारले, तर त्याने खाली उतरून माझ्या कानशिलात मारली.’ प्रवाशांसोबत गैरवर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. जखमी रिक्षाचालकावर बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *